|| श्री येडोबा प्रसन्न ||

     श्री येराडसिद्ध येडोबा राजाची यात्रा 7 एप्रिल 2023 ला हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होईल.

येडोबा देवस्थान

येराड!
पाटण तालुक्यातील एक लहानसे टुमदार गाव हे गाव कराड - चिपळूण रस्त्यावर पाटण पासून चार किलोमीटर अंतरावर कोयना नदी तीरावर वसलेले असून श्री येडोबा देवाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. पाटण तालुक्याचा पश्चिमेला सह्याद्रीच्या कुशी मध्ये वसलेले हे तीर्थक्षेत्र आहे.
तीर्थक्षेत्राच्या उतरेस पुरातन घेरादातेगड, दक्षिणेस किल्लेमोरगिरी (गुणवंतगड ) तर पश्चिमेस सह्याद्री पर्वतांच्या रांगा असून कोयनातीराच्या रम्य देवराईमध्ये श्री येडोबा देवाचे स्थान आहे. या ठिकाणाला 'बनपेठ' या नावाने सुद्धा ओळखले जाते. निसर्गरम्य देवराईमध्ये येडोबा मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश घेतल्यानंतर देवाच्या मूर्तीसमोर दगडी नंदीची भव्य मूर्ती व कासव आहे. त्यामुळे श्री क्षेत्र येडोबा हे शिवमंदिराची साक्ष देते. मंदिराची मुळची धाटणी हेमांडपंथी, मूळ मंदिराची ग्रामस्थांनी कायापालट केला आहे. मंदिराला शोभेल असा भव्य कळस व सुसज्ज सभामंडप बांधण्यात आला आहे. मंदिरातील गाभाऱ्या मध्ये प्रवेश करताना दोन भल्या मोठ्या दगडी मूर्ती उभ्या आहेत. त्यांना 'रडवे' असे म्हणतात.
त्याचा इतिहास सुद्धा फार मनोरंजक आहे - श्री येडोबा व देवी जोगेश्वरी यांच्या लग्नाच्या वेळी हे दोन भाऊ उपस्थित होते. लग्नाच्या वेळी मानपमानासाठी हे दोन भाऊ रुसून बसले होते. त्यांचे प्रतिक म्हणून मंदिरातील गाभाऱ्याच्या प्रवेशदारावरच दोन्ही बाजूला उभे असलेले रडवे त्याची साक्ष देतात.
मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मध्यभागी येडोबा दैवत ठाण मांडून बसलेले आहे. उजव्या बाजूला देवी जानुबाईची मूर्ती असून डाव्या बाजूस येडोबा देवाचे रक्षक उभा आहे.गाभाऱ्यातील सभामंडपाच्या डाव्या बाजूला उतराभिमुख शिवलिंग आहे. मंदिराच्या उतरेस देवी जोगेश्वरी मंदिर आहे. या मंदिरामध्ये पुरातन काळातील अनेक दगडी मूर्ती ठेवलेल्या आहेत. येडोबा मंदिरापासून पूर्वेला काही अंतरावर कोपऱ्यात श्री नाईकबा देवाचे जीर्णोद्धार केलेले देवालय आहे. येडोबा देवालयाच्या मालकीची १३ एकर जमीन आहे. मंदिराच्या देवराईमध्ये अनेक प्रकारची पुरातन वृक्ष आहेत.
देवराई मुळे मंदिराचा परिसर निसर्गरम्य असून ऐन उन्हाळ्यामध्ये सुद्धा शांत, आल्हाददायक वातावरून असते.

उत्सव

येडोबा माझा मी येडोबाचा

मानाच्या सासनकाठ्या

चैत्र यात्रेत गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते. सासनकाठ्या चाळीस फूट उंचीच्या असतात. रंगीबेरंगी कपड्यांनी सजविलेल्या सासनकाठ्या आकर्षक व सुंदर दिसतात. काही काठ्यांना नोटांच्या माळा, फुलांच्या माळा असतात. हलगी, पिपाणी, तुतारी, सनईच्या तालावर काठ्या विशिष्ट पद्धतीने नाचविल्या जातात. भर उन्हात तरुण वर्ग, गुलालात चिंब होऊन नाचतो. सर्वांच्या मुखात येडोबाच्या नावानं चांगभलचा अखंड गजर असतो.

श्री येडोबा

येडोबा देवस्थान येराड महाराष्टातील तसेच कर्नाटकातील सर्वात लोकप्रिय आसलेले तसेच कोयना काठी वसलेले हे मंदिर आहे. या देवाचा इतिहास खूप मोठा व प्राचीन आहे. या देवाच्या दर्शना साठी लोकांची खूप गर्दी असते.या देवाची यात्रा एप्रिल (चैत्रपौर्णमेला) महिन्यात असते.लाखो भाविक या देवाच्या दर्शन साठी येतात.
मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मध्यभागी येडोबा दैवत ठाण मांडून बसलेले आहे. उजव्या बाजूला देवी जानुबाईची मूर्ती असून डाव्या बाजूस येडोबा देवाचे रक्षक उभा आहे

भक्तीचा सागर

हनुमान जयंतीस दरवर्षी एप्रिल मध्ये येडोबाची विराट जत्रा भरते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून व परप्रांतातून सुमारे सहा-सात लाख भाविक या यात्रेसाठी येतात. या वेळी भक्तांचा विराट जनसागर आपले संपूर्ण देहभान हरपून, 'चां S S ग भलं' च्या एकच जयघोषात येडोबाच्या नावाचा गजर करतात आणि अवघा डोंगर या एकच जयघोषाने दुमदुमून जातो. गुलालाची उधळण, खोबऱ्याची पाखरण, पालखीवर फेकली जाणारी बंदी नाणी हे सारे 'उत्सव दृश्य' अगदीच अनोखे असते.

परिसरातील मंदिरे

महादेवाचे मंदिर

येडोबा मंदिर परिसरात अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत त्यापैकी एक म्हणजे महादेव मंदिर. या मंदिरात सुंदर शिवलिंग आहे.महादेवांची सुरेख मुर्ती आणि गाभाऱ्यातील शांतता मन प्रफुल्लित करून टाकते.
भगवान शंकर हे तमोगुणाचे कारक असून सृष्टीचा संहार आणि विघटन त्यांच्या अधिपत्याखाली आहे. हे त्रिदेव म्हणजे नित्य नियमित जन्म-मरण चक्राची रूपके आहेत. शिव हा योगी मानला जातो आणि शिव शंकराची पूजा लिंग स्वरूपात केली जाते.भगवान शिव यांची अनेक नावे आणि विविध रूपे प्रसिद्ध आहेत.
हर हर महादेव....

नाईकबाचे मंदिर

श्री येडोबा राजा चे व जोतिबा राजाचे लहान भाऊ श्री नाईकबा मंदिर हे येडोबा देवाच्या समोरील बाजूस पूर्वाभिमुख असून हे जागृत देवस्थान आहे. देवांची बहिण नेरळे निवासिनी आई माऊली श्री जानाईदेवी ची सासनकाठी जत्रा काळात ह्या मंदिराशेजारी उभी असते. आणि हितुन ह्या काठीचा छबिना सुरू होतो.
तसेच छबिना संपल्यानंतर सर्व मानाच्या सासनकाठ्या ह्या मंदिराजवळ येऊन मंदिराला प्रदक्षिणा घालून देवाची भेट घेतात,आणि मग येडोबा देवाच्या छबिन्याची सांगता होते.
नाईकबाच्या नावानं चांगभलं.....

जोतिबाचे मंदिर

येडोबा मंदिर परीसरात जोतिबाचे मंदिर आहे.
ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते.
‘देवामंदी देव ज्योतिबा लई मोठा.. चैत्याच्या मईन्यात त्याच्या फुलल्या चारी वाटा’

बातम्या आणि अपडेट्स

Python Fundamentals

I had completed this cousre on Great Learning. This course helps me alot to undesrtand fundamentals of python

DataBase Management System

This DBMS 2 months Course conducted by IIT Kharagpur. this Course is offered by NPTEL with proctored Exam

Cpp Fundamentals

I had completed this cousre on Great Learning.This was really helpful to understand basics of cpp language

पुढे वाचा

तुमचा मौल्यवान अभिप्राय आम्हाला पाठवा

संपर्क

prasadd462002@gmail.com

+91 8830902396

लेख